जळगाव : प्रतिनिधी
नांद्रा बुद्रुक गावात मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. यात दंगलीचेही कलम लावण्यात आले आहे.
सोमवारी हा वाद झाला. या प्रकरणी तुळसाबाई बळीराम बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी चंद्रभान किटकुल सोनवणे, रवींद्र चंद्रभान सोनवणे, कोकिळा सोनवणे, मंगला सोनवणे, शोभा सोनवणे, रत्ना सोनवणे यांनी तुळसाबाई यांना जुन्या वादातून शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी तुळसाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिस हवालदार अभिषेक सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल आहे. दोन्ही गटातील संशयितांनी हाणामारी करत, शांततेचा भंग केल्या प्रकरणी पोलिसांकडून हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तुळसाबाई बाविस्कर, वैशाली बाविस्कर, लता बाविस्कर, कविता बाविस्कर, संगीता बाविस्कर यांचा सहभाग आहे. या प्रकरणी पुढील तपास संजय भालेराव हे करत आहेत.