जळगाव : प्रतिनिधी
धावत्या रेल्वेची धडक लागून ऋषीकेश आनंदा मिस्तरी (२५, रा. हरिविठ्ठलनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ७) शिरसोली ते जळगावदरम्यान घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, हरिविठ्ठलनगरातील ऋषीकेश मिस्तरी हा तरुण मजुरी काम करायचा. रविवारी शिरसोलीदरम्यान डाऊन रेल्वे मार्गावर खंबा क्रमांक ४१६/४१४ जवळून जात असताना त्याला रेल्वेची धडक लागली व त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेथून जात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली. या परिसरातील नागरिकांनी मयताची पटवली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत कळसकर करीत आहेत