पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील कुरंगी येथे घरच्या शेतात भर दुपारी विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
कुरंगी येथील ३२ वर्षीय विवाहित तरुण भूषण आनंदा पाटील हा नेहमीप्रमाणे कुरंगी गावाजवळीलच सोनटेक शेतशिवारातील त्याच्या स्वतःच्या शेतात आई-वडिलांसोबत मका पिकाच्या कामानिमित्त गेला होता. दुपारी विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी पोहोचला असता काठावर पाय घसरून मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार होय.
भूषण पाटील हा विहीरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बऱ्याच वेळानंतर या घटनेबाबत ग्रामस्थांना माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.