Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुटखा घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला !
    क्राईम

    गुटखा घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला !

    editor deskBy editor deskApril 8, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे शिवारातील अहमदाबाद येथून अमरावती येथे गुटखा, सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या कंटेनरला पोलिस महानिरीक्षक यांचे पथक व पारोळा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, सोमवारी पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरून गुटखा घेऊन कंटेनर जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नाशिक येथील पोलिस महानिरीक्षक यांचे पथक व पारोळा पोलिस दाखल झाले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास म्हसवे शिवारात कंटेनर आला असता पोलिसांनी कंटेनरला अडवून झाडाझडती घेतली असता पुढील भागात कंटेनरमध्ये प्लास्टिकच्या ताडपत्री, मागील बाजूस ५० ते ६० मोठ्या पिशव्यात सुगंधी तंबाखू, गुटखाजन्य पदार्थ ठेवल्याचे आढळून आले. याबाबत चालक भरत वीरसिंग वाळवंट (३५, दावत जि. गोध्रा, गुजरात) याला पकडण्यात आले. हा कंटेनर गुजरातमधून महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात उतरणार होता. रात्री उशिरापर्यंत पोलिस निरीक्षक सुनील पवार, पोउनि योगेश महाजन, हेकॉ डॉ. शरद पाटील, अभिजीत पाटील, महेश पाटील, विजय भोई आदींनी कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.