जळगाव – प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने युवती सभेचे अंतर्गत एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेचे डॉ. सुनिता चौधरी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर . बी. वाघुळदे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियांका ब-हाटे , युवतीसभा प्रमुख प्रा. देवयानी पाटील हे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगत नातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर बी वाघुळदे यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी या एक दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. युवतींचे व्यक्तिमत्व सर्वगुणसंपन्न असेल तर कुटुंब व समाजाची प्रगती होते पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. शैक्षणिक गुणवत्तेचे बरोबर प्रभावी व्यक्तिमत्व असणं ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प उद्घाटक व व्याख्याते डॉक्टर सुनिता चौधरी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव यांनी ,”व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व गुण” या विषयावर गुंफले यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना – “युवतींनी प्रथम स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःला महत्त्व द्यायला हवे. आपल्या बौद्धिक विकासासाठी वाचन मनन चिंतन करायला हवे. नेतृत्व गुण हा प्रत्येक युवती मध्ये असतो पण तो तिने ओळखायला हवा. समाजाच्या कुटुंबाच्या विकासाबरोबर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायला हवा . समाजाच्या कुटुंबाच्या विकासाबरोबर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायला हवा. रामायण-महाभारत इतिहास व आधुनिक युगातील अनेक दाखले देत युवतींनी व्यक्तिमत्व विकासाबरोबर नेतृत्वगुण कसे विकसित करू शकतात” याविषयी मार्गदर्शन केले.
द्वितीय पुष्प सौ कुमुद नारखेडे यांनी. “संस्कार भारती तुन चित्रीत होणारी संस्कृती” या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. रांगोळी हा संस्काराचा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे सौंदर्याचा आत्मसाक्षात्कार मांगल्याची सिद्धी म्हणजे रांगोळी. भारतीय संस्कृतीत रांगोळीला खूप महत्त्व आहे. शुभ स्पंदन रांगोळीतून निर्माण होतात. कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार महत्त्वाचे असतात रांगोळी मुळे मांगल्य सुसंस्कृती निर्माण होते. रांगोळी मुळे शारीरिक व्यायाम होतो शिक्षणाला प्रशिक्षणाची जोड दिली तर तुम्ही यशस्वी व्हाल असे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात “पर्यावरण जनजागृती” या विषयावर प्रा. डॉ व्ही . जे . पाटील यांनी आजची युवती व पर्यावरण यांची सांगड घालून आपल्या आजूबाजूचा परिसर आपण कसा ठेवतो. त्यातूनही व्यक्तिमत्व विकास घडतो. भारतातच नव्हे तर जगात पर्यावरण जनजागृती करणारी ही पहिली महिलाच होती. पर्यावरण जागृतता टेस्ट प्रत्येकाने करावी व आत्मपरीक्षण करावे. लाईट बंद करणे, पायी चालणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, यासारखे पर्यावरणाचे 12 मंत्र त्यांनी यावेळी युवतींना दिले. पर्यावरण संदर्भात आपण किती जागृत आहोत याविषयी प्रश्नावलीच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले.
चौथे पुष्प गुंफताना डॉ. भारती गायकवाड यांनी “आर्थिक सुबत्ता व महिला सक्षमीकरण” या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे काळाची गरज आहे. तिला तिच्या हक्कांची जाणीव असायला हवी. बचत करणे व वेळ प्रसंगी त्या पैशाचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा याचे नियोजन देखील तिला करता येणे गरजेचे आहे.
मुलींना समाजात जीवन जगत असताना अनेक मर्यादांचा सामना करावा लागतो तिच्यातील पराधीनता जाऊन आत्मनिर्भरता निर्माण व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते असे प्रास्ताविकातून युवती सभा प्रमुख प्रा. देवयानी पाटील यांनी सांगितले. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापिका प्रियांका ब-हाटे यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी या एक दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले चार सत्रात चाललेल्या या ज्ञानयज्ञात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी आपापल्या अनमोल विचारांनी विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यसिद्ध स आत्मविश्वासाचा सेतू निर्माण केला असे प्रतिपादन केले.
यावेळी महाविद्यालयातील ६० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्राध्यापिका उत्कर्ष भंगाळे. यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापिका वृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.