नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वितरण कंपन्यांनी 50 रूपयांनी वाढ केली आहे. जनरल ग्राहक तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ही दरवाढ लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने किचनचे बजेट बिघडणार आहे.
14.2 किलोग्रॅमचे गॅस सिलिंडरची किंमत आता 853 रूपये आणि उज्वला गॅस योजनेतील सिलिंडरची किंमत आता 553 रूपये इतकी असणार आहे. जनरल ग्राहकांसाठी दरवाढीपुर्वी 14.2 किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत 803 रूपये होती. ती आता 853 रूपये झाली आहे. तर उज्वला ययोजनेतील ग्राहकांसाठी गॅसची किंमत 503 रूपये होती ती 553 रूपये इतकी झाली आहे.