जळगाव : प्रतिनिधी
प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून सोबत काढलेल्या तरुणीच्या आक्षेपार्ह फोटोवर अश्लील शिवीगाळ लिहून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. काही वर्षापूर्वी ती गावी गेल्यानंतर नात्यातील तरुणाशी तिची ओळख व त्यांचे प्रेम जुळले होते. त्यांनी सोबत फोटोदेखील काढले होते. त्यानंतर तरुण दारूच्या नशेत तरुणीवर संशय घेऊन भांडण करीत असल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत प्रेमसंबंध तोडले. याचा राग आल्याने त्याने सोशल मीडियावर तरुणीसोबतचा फोटो आणि त्यावर अश्लील शिवी लिहून तो व्हायरल केला. तरुणीने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे