धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील देशमुख वाड्यात माजी सरपंच आलिम देशमुख व मित्र परिवारातर्फे रमजान ईदमिलननिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले होते.
याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच विजय पाटील, शरद कोळी, उद्योगपती शरद कासट, दिलीप पाटील, विजय झवर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे आदी उपस्थित होते. जि. प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पत्रकार हेमंत अलोने, विजय महाजन, सावखा पठाण, नईम देशपांडे, सलीम खान, पंढरीनाथ ठाकूर, अरुण पाटील, डॉ. राजू देशमुख, डॉ. परवेज देशपांडे, कालू खाटीक, अनिल सोमाणी, श्रीकृष्ण साळुंखे, मुन्ना झवर, दीपक झवर, गोपाल सोनवणे, दीपक श्रीखंडे आदी उपस्थित होते.
तरुण पिढीने क्षुल्लक कारणावरून वाद टाळावा. गावात शांतता राखण्यासाठी शर्थीने प्रयत्न करावे, बाहेरील काहीजण यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. गावात नेहमीप्रमाणे एकी ठेवा. गावातील शांततेचा भंग करू नका, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन भूषण महाजन यांनी केले. यशस्वितेसाठी देशमुख वाड्यातील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.