जळगाव : प्रतिनिधी
जळगाव मनपाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. आता यातील 43 जणांनी तहसीलदारांच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर करून जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळवल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारात 11 अशा व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार नवीनचंद अशोक भावसार यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये 43 जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
बुशरा खान मोहम्मद इस्लाउद , मोहसिन चांद मोहम्मद, निगार सुलताना हाफिज खान, समीर खान अयुब खान, नसरीन बानो आयुब खान, अफजल खान, आयुब खान, नदीम खान, हाफिज खान, शिरीष बानो फरीक शहा, आरिफ खान इसा खान, खान असदुल्ला खान हाफिज, शहाआरिफ अहमद, समशेर बेग तुराब बेग, तोसिफ शहा जिनाउल्ला शहा, तुराब बेग गुलाब बेग, शहनाज वी शेख मुनीर, वाहेदाबी अब्दुल गणी, अब्दुल्ला अजगर अली सय्यद, नुसरत बानो, जबीउल्ला शहा, शहा अयाज अहमद अब्दुल अजीज, मोहम्मद वसीम जबी मुल्ला शाहा, मोहम्मद, जनीक परविन अमानुउ ल्ला शाहा, बिस्मिल्लाह खान, शेख सलीम शेख बशीर, शेख अनिल शेख बशीर, मोहम्मद अखिल शेख बशीर, मोहम्मद कलीम शेख बशीर, शरीफ नईमोद्दीन, मोहम्मद शकील शेख बशीर, अमरीन रशीद पटेल, जाकीर फकीर मोहम्मद तांबोळी, तबसून परविन मोहम्मद इकबाल, शेख मोहम्मद इकबाल अब्दुल रहीम, राहत नाज जबीउल्ला शाहा, तसलीमा बी शेख यासिम, शोहरत अली शरीफ मुनसारी, शेख शांनदोस शेख इसाक, या सर्वांच्या विरुद्ध नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत असेही नमूद आहे की, यातीलच 11 जन्म-मृत्यू अर्जांची नावे तहसील कार्यालयाच्या आवक रजिस्टरमध्ये नोंदलेली आहेत. मात्र, त्यांनी सादर केलेल्या जन्म मृत्यू नोंदणी आदेशावरील तहसीलदारांची सही बनावट असल्याचे आढळून आले आहे.