Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तारखेत बदल होऊ शकतो पण या भावाच्या निस्वार्थ प्रेमात कधीच बदल होणार नाही : आ.मंगेश चव्हाण
    चाळीसगाव

    तारखेत बदल होऊ शकतो पण या भावाच्या निस्वार्थ प्रेमात कधीच बदल होणार नाही : आ.मंगेश चव्हाण

    editor deskBy editor deskApril 5, 2025No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव  : प्रतिनिधी

    दरवर्षी तालुक्यातील हजारो आशा अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात त्या आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशन तर्फे आयोजित केला जाणारा भाऊबीज सोहळा अखेर मराठी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात उत्साहात संपन्न झाला. तालुकाभरातून उपस्थित असलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी आपल्या या रक्ताच्या नाही पण दरवर्षी माहेरपण साजरे करणाऱ्या लाडक्या भावाचे औक्षण करत आशिर्वाद दिले. आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील सर्व बहिणींना साडी भेट देत त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्ती केली. . राज्य शासनाने २०२४ पासून लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाची योजना सुरु केली मात्र त्याच्या ४ वर्ष अगोदरच आमदार मंगेश चव्हाण यांनी १५०० हून अधिक आशा अंगणवाडी सेविका यांच्यासाठी स्वखर्चाने सुरु केलेल्या या भाऊबीज माहेरपण सोहळ्याचे राज्यभरात एक आदर्श पॅटर्नचे म्हणून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

    अतिशय अल्प मानधनात कर्तव्य बजावणाऱ्या चाळीसगाव शहर व तालुक्यातील जवळपास १५०० आशा – अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सन्मानार्थ त्यांचा भाऊ या नात्याने सन २०२० पासून आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या पत्नी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण यांच्या माध्यमातून या सेविकांना साडी भेट देऊन त्यांचे माहेरपण साजरे केले जाते तसेच त्यांच्या एका मुलीच्या लग्नासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने २५ हजारांचा मामाचा आहेर देखील दिला जातो. गेल्या ३ महिन्यात झालेल्या १३ विवाहांना प्रत्येकी २५ हजार प्रमाणे ३ लाख २५ हजारांचा मामाचा आहेर आजच्या सोहळ्यात सुपूर्द करण्यात आला. आतापर्यंत तालुक्यातील १०४ आशा – अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी २५ हजारांप्रमाणे २६ लाखांची मदत देण्यात आली आहे.

    दरवर्षी दिवाळी नंतर १ जानेवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी विधानसभा निवडणूक, अधिवेशन आदी कामांमुळे ३ महिने उशिरा आयोजित करण्यात आला. त्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित सर्व बहिणींची माफी मागत जरी काही कारणामुळे भाऊबीज सोहळ्याच्या तारखेत बदल झाला तरी ज्या भावनेने व आपुलकीने हा सोहळा मी आयोजित करतो त्यात जरासाही बदल होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच आशा अंगणवाडी ताई या स्तनदा मातांपासून ते लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात. मी तुम्हाला बहिण मानले आहे त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हीदेखील माझी जबाबदारी असून लवकरच तालुक्यातील सर्व आशा अंगणवाडी ताई यांच्यासाठी संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केली जाईल असे त्यांनी जाहीर केले यासोबतच प्रत्येकाला आपल्या मुलांचे लग्न मंगल कार्यालयात, चाळीसगाव शहरात व्हावे अशी इच्छा असते मात्र परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही त्यासाठी आशा अंगणवाडी ताईंच्या मुला – मुलींच्या लग्नासाठी येणारा मंगल कार्यालयाचा २५ ते ३० हजाराचा खर्च वाचावा म्हणून चाळीसगाव शहरालजवळ खडकी बु येथील ४ ते ५ हजार रुपयात लग्नासाठी मंगल कार्यालय शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषणा त्यांनी केली.

    चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार साहेबरावजी घोडे, पोपट तात्या भोळे, देवयानीताई ठाकरे, पाचोरा येथील मधूभाऊ काटे, अमोल नाना पाटील, पारोळा येथील गोविंद आबा शिरुडे, अतुलदादा पवार, के बी दादा साळुंखे, धर्मा आबा वाघ, मच्छिंद्रभाऊ राठोड, वनिताताई विश्वास पाटील, यु डी माळी सर, प्रा. सुनील निकम, नितीन भाऊ पाटील, शेषराव बापू पाटील, संजय तात्या पाटील, धनंजयअप्पा मांडोळे, संगीताताई गवळी, सुलभाताई पवार, भाऊसाहेब तात्या जाधव, रवी आबा पाटील, सुभाष दादा पाटील, आशालाताई विश्वास चव्हाण, निलेश महाराज राजपूत, विश्वास भाऊ चव्हाण, आनंदजी खरात, प्रा.साधनाताई निकम, मोहिनीताई गायकवाड, मनिषाताई पगार, वैशालीताई सोमसिंग राजपूत, विजयाताई भिकन पवार, अलकनंदाताई भवर, रिजवानाताई खान, भैय्यासाहेब आनंदराव पाटील, कपिलदादा पाटील, साहेबराव राठोड, प्रभाकरभाऊ जाधव, बाळासाहेब राऊत, भावेश कोठावदे, प्रभाकरभाऊ चौधरी, निलेश महाराज राजपूत, रवींद्र भावडूदादा पाटील, शैलेंद्र पाटील सर, नवलदादा पवार, प्रदीपदादा पाटील, राहुलदादा पाटील यांच्यासह शिवनेरी फाउंडेशन अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    आपल्या मनोगतात बोलताना आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, एक भाऊ म्हणून मी नेहमी माझ्या बहिणींच्या सुख-दुःखात सहभागी असतो. या नात्याची जाणीव ठेवत, गेल्या चार वर्षांत मी १०४ भाचींच्या लग्नात मामाचा आहेर म्हणून २५,०००/- प्रमाणे २६ लाख रुपये आहेर दिला आहे. आपल्या मागच्या महायुती सरकारच्या काळात भरघोस अशी मानधन वाढ करण्यात आली यासोबतच अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ लाख सानुग्रह अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मी पुन्हा आमदार झालो आणि राज्यात देखील आपले महायुतीचे सरकार आले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रम अंतर्गत सरकार आल्यानंतर चाळीसगाव तालुक्यात ५० हून अधिक अंगणवाडी सेविका / मदतनीस यांची भरती करण्यात आली व या १ एप्रिल पासून त्या जॉईन देखील झाल्या असून या सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या परिवारात स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रम प्रसंगी साहेबराव घोडे, देवयानीताई ठाकरे, पोपट तात्या भोळे, के बी दादा साळुंखे, संजय तात्या पाटील, प्रा,सुनील निकम यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक संगीता गावली यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रदीप देसले यांनी पार पाडली तर आभार एड.सुलभा पवार यांनी मानले. सोहळ्याच्या सुरुवातीला नुकत्याच कन्नड येथे झालेल्या अपघातातील पातोंडा येथील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी भाजपा, शिवनेरी फाउंडेशन पदाधिकारी, अंत्योदय जनसेवा कार्यालय येथील जनसेवक यांनी परिश्रम घेतले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.