Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भडगाव परिसरात आढळले बिबट्याचे पिल्लू : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !
    क्राईम

    भडगाव परिसरात आढळले बिबट्याचे पिल्लू : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

    editor deskBy editor deskApril 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव  : प्रतिनिधी

    भडगाव शिवारात एरंडोल रस्त्यावर बिबट्याचे लहान पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले. त्यामुळे या परिसरात बिबट्या मादीचा वावर असावा, असा संशय नागरिकांना आहे. यामुळे शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  या परिसरात नेहमी बिबट्याचा वावर असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे. भडगाव, कृषी विभाग परिसर, पिंपळगाव, आमडदे शिवार या भागांमध्ये बिबट्याचे वेळोवेळी दर्शन झाले आहे. अनेक वेळा पशुधनाला बिबट्याने ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव-एरंडोल रोडवर बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. या पिल्लावर प्रथमोपचार करून नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले हे बुधवारी रात्री भडगावहून एरंडोलकडे जात होते. त्यावेळी भडगाव नजीकच त्यांना रस्त्यातच बिबट्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिले. त्यांनी वाहन थांबवून वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनपाल नंदू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येत पिल्लावर प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवले. वेळीच मदत मिळाल्याने बिबट्याच्या पिल्लाला जीवदान मिळाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.