पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील वरखेडी येथे सुरू असलेल्या चक्री नावाच्या ऑनलाइन सट्टयावर पोलिसांनी धाड टाकून एकास मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पिंपळगाव (हरे) पोलिस ठाण्यातर्फे मंगळवारी वरखेडीत ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोहेकों अभिजीत दिलीप निकम यांनी फिर्याद दिली आहे. वरखेडी गावी बाजारपट्टा भागात सागर अशोक चौधरी (वरखेडी, ता. पाचोरा) हा संगणकाच्या साहाय्याने ऑनलाइन पद्धतीने चक्री नावाचा सट्टा खेळत असल्याबाबत सपोनि प्रकाश काळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी पोउनि सर्जेराव क्षीरसागर, पोकॉ अमोल पाटील, नामदेव इंगळे, दीपक आहिरे, विकास पवार यांच्या पथकाला पाठवले. या पथकाने सागर अशोक चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७ हजार १०० रुपयांचा माल तसेच दीड हजार रुपये असे साहित्य जप्त करण्यात आले. तपास हेकॉ. किरण ब्राह्मणे करीत आहेत