पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील पुनगाव रोडवरील ऑनलाइन वस्तू पोहोच करणाऱ्या कंपनी कार्यालयात चोरट्यांनी १ एप्रिलच्या पहाटे चोरी करून साडेचार लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही व डीव्हीआरदेखील चोरून नेल्याने कोणताही माग ठेवला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुनगाव रोडवरील आदर्शनगर भागातील भरत महाले यांच्या मालकीच्या घरात कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात ३१ मार्चच्या मध्यरात्री ते १ एप्रिलच्या सकाळपर्यंत मार्चअखेरची मिळालेली रोकड ४ लाख ५० हजार मात्र कार्यालयातच ठेवली होती. एरव्ही ही रक्कम दररोज बँकेत भरणा केली जात असे. मात्र बँकेला सुट्टी असल्याने भरणा केला नाही. याची खात्री होत चोरट्यांनी कार्यालयातील साडेचार लाख रोकड लंपास केली. या घटनेची पाचोरा पोलिसांना खबर दिली असून पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.