एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील विवाहितेला पैश्यांसाठी शिवीगाळ करून मारहाण करत छळ केल्याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील माहेर असलेल्या पूजा रोहित बारगळ (वय-२४) या तरुणीचा विवाह नाशिक येथील रोहित कृष्णा बारगळ याच्याशी झाला. विवाहितेला माहेरहून २ लाख रुपये घरखर्चासाठी आणावे, अशी मागणी रोहित बारगळ याने केली. पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. ननंद, सासू आणि नंदोईभाऊ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता या आडगाव येथे माहेरी निघून आल्या. दरम्यान कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती रोहित कृष्णा बारगळ, सासु ताराबाई कृष्णा बारगळ, नणंद मेघाराणी कृष्णा बारगड सर्व रा. विष्णुनगर, नाशिक, मोठी नणंद वर्षा रावसाहेब वनवे, नंदोईभाऊ रावसाहेब भीमराव वनवे रा. पाथर्डी फाटा नाशिक या ५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युवराज कोळी करीत आहे.