जळगाव : प्रतिनिधी
काहीही कारण नसताना सद्दाम शहा हुसेन शहा (४२, रा. तांबापुरा) या भंगार विक्रेत्यासह त्याच्या मुलावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री तांबापूरा परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंगार विक्रेते सद्दाम शहा हुसेन शहा यांच्या घरासमोर येऊन दोन जणांनी चाकू सारख्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. शहा यांचा मुलगा साहील हा तेथे आला असता, त्याच्यावर देखील एकाने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सद्दाम शहा यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. रामदास कुंभार करीत आहेत.