Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अनैतिक संबंधांचा संशय : २२ वर्षीय तरुणाची कोयत्याने हत्या !
    क्राईम

    अनैतिक संबंधांचा संशय : २२ वर्षीय तरुणाची कोयत्याने हत्या !

    editor deskBy editor deskApril 2, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यात अनैतिक संबंधांतून अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातील वडगाव मावळ येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. मंगळवार दि. १ एप्रिल रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास शनि मंदिराजवळ आंबेवाडी, कान्हे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून या २२ तरुणाच्या हत्येने संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. वैभव उमेश सातकर (वय २२, रा. आंबेवाडी, कान्हे) असे हत्या  झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश जयवंत सातकर (वय ४२, रा. आंबेवाडी, कान्हे) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे.

    वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत वैभव सातकर व आरोपी अंकुश सातकर दोघे शेजारी राहत असून मयत वैभव सातकर याचे अनैतिक संबंध असल्याचा त्यांना संशय असल्याने  आरोपी अंकुश सातकर याने कोयत्याने वार करत वैभव सातकर याची हत्या केली. थेट मानेवरच वार झाल्याने वैभव याचा जागीच मृत्यू झाला.

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते व पोलिसांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आला आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आशा भोसले अकॅडमीपासून भरतीत क्रांतीपर्यंत : मंत्रिमंडळाचे 8 दमदार निर्णय !

    April 13, 2026

    “दैवी अवतार”चा मुखवटा गळाला! अशोक खरात पोलिस कोठडीत गार !

    April 13, 2026

    चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू; मंदिर परिसरात घडली हृदयद्रावक घटना

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.