जळगाव : प्रतिनिधी
पायावरून दुचाकीचे चाक नेल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून राहुल राजू सोनवणे याला बेदम मारहाण करण्यात येऊन कोयत्याने पाठीवर आणि खांद्यावर वार केले. ही घटना ३० मार्च रोजी महाबळ परिसरातील साई विहार अपार्टमेंटजवळ घडली.
याप्रकरणी सविता सोनवणे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहीत परदेशी (१८), नितीन संतोष सोनवणे (२२) व गणेश बुधा सोनवणे (२२, सर्व रा. समता नगर) यांना अटक केली. त्यांच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.