जळगाव प्रतिनिधी । शहरातील जाखणी नगरात बंद घर फोडून २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंगी आकाश दहियेकर (वय-३०) रा. सिंधी कॉलनी जवळ, जाखणीनगर, कंजरवाडा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शनिवार २५ मार्च रोजी रात्री शिंगी दहियेकर यांचे घर बंद असतांना संशयित आरोपी सोनु जगदीश बावरी, मोनूसिं जगदीश बावरी, भोलासिंग जगदीश बावरी रा. शिरसोली नाका, तांबापुर या तिघांनी शिंगी दहियेकर यांचे बंद घराची कडी खोलून आत प्रवेश करत घरातून ५० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम सोन्याची चैन चोरून नेली आहे. यासंदर्भात शिंगी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिघांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोनू बावरी, मोनू बावरी आणि भोला बावरी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश सपकाळे करीत आहे.