Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात उष्णता लाटेचा प्रशासनाचा इशारा; नागरीकांना सतर्कतेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन
    जळगाव

    जिल्ह्यात उष्णता लाटेचा प्रशासनाचा इशारा; नागरीकांना सतर्कतेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 27, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात २९ ते ३१ मार्चतीन दिवसाच्या कालावधीत हवामान विभागाने उष्णता लाट असल्याबाबतचा इशारा दिला आहे. जिल्हावासीयांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रविवारी २७ मार्च रोजी दुपारी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

    जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाची दहकता वाढली असून मार्च माहिन्याच्या अखेरीस म्हणजे २९, ३० आणि ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात उष्णता लाट असल्याचा इशारा हवामान विभागाने जळगाव जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

    नागरीकांनी काळजी घेतांना काय करावे आणि काय करू नये याबाबत सांगण्यात आले आहे. यामध्ये

    १. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
    २. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
    ३. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करण्यात यावा.
    ४. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
    ५. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.
    ६. शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.
    ७. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
    ८. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी घ्यावे.
    ९. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात.
    १०. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
    ११. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
    १३. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
    १४. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
    १५. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
    १७. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावा.

    १. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.
    २. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.
    ३.गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
    ४. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.
    ५. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडकी उघडी ठेवण्यात यावी.
    अशी माहिती जिल्हाप्रशासनाकडून देण्यात आली आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.