Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खेडीनजीक भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार !
    क्राईम

    खेडीनजीक भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार !

    editor deskBy editor deskMarch 30, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे महेंद्र एकनाथ बोंडे (३८, रा. गणेश कॉलनी, भुसावळ) हे खाली पडून डोक्यावरून चाक गेल्याने जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी (२९ मार्च) सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंपनीत कामावर येत असताना झाला व कामावर पोहोचण्यापूर्वीच बोंडे यांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की बोंडे यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र बोंडे हे जळगाव औद्योगिक वसाहतीमधील गणेश अल्युमिनियम कंपनीमध्ये कामाला होते. दररोज ते भुसावळ येथून दुचाकीने अपडाऊन करत होते. शनिवारी (२९ मार्च) सकाळी ते दुचाकीने (क्र. एमएच १९, बीडी ०६०२) कामावर येत असताना खेडी फाट्याजवळील अरुंद पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण अरुंद पुलाचे असून आजूबाजूला नाला आहे. तसेच काही अंतरावर शेती असल्याने नेमके घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही नाही. त्यामुळे अपघाताचे फुटेज मिळणे अवघड झाले आहे. अज्ञात वाहनाने धडक दिली असली हे वाहन ट्रक असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    महेंद्र बोंडे यांच्या आई-वडिलांचे बायपास झालेले असून त्यांना मधुमेह व इतरही व्याधी आहेत. वृद्ध आई-वडिलांचे महेंद्र हे एकुलता एक आधार होते. कंपनीत काम करून मिळणाऱ्या पगारावर ते आजारी आई-वडिलांचा संभाळ करण्यासह त्यांचा उपचारही करीत होते. मात्र आता या अपघाताने आई-वडिलांचा आधार हिरावला आहे. वृत्त समजताच कंपनी मालकासह कामगारांनी रुग्णालयात धाव घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.