जळगाव : प्रतिनिधी
पाळधी ते तरसोद बायपास चे काम सुरू आहे ऍग्रो इन्फ्रा या ठेकेदाराकडून अवैध गौण खनिजचे उत्खनन झाल्याचे उघड झाले आहे शासनाला किरकोळ रक्कम भरून महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून करोडो रुपयाचे अवैध गौन खनिज उत्खनन झालेले आहे. अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे झाले आहे परंतु महसूल मोठ्या प्रमाणात या भ्रष्टाचारात सहभागी असल्याने कारवाई होणे अपेक्षित दिसत नाही.
महामार्ग तरसोद ते पाळधी बाय पासचे काम सुरू आहे. शासनाच्या सुचनानुसार सदरचे काम प्रगतीपथावर असून लवकरच महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल यात शंकाच नाही. परंतु सदरचे काम करणारी ठेकेदार कंपनी अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर प्रा.लि.या कामासाठी लागणारा मुरूम गौणखनिज चोरी करत असून त्या ठिकाणी शासनाचे करोडो रूपयांचे नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे.
नशिराबाद शिवारातून विमानतळ हद्दीतील अनेक गट तसेच गट क्र.१६४० व अन्य काही गटांतून अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर प्रा. लि. कंपनीने आतापर्यंत लाखो ब्रास उत्खनन केलेले आहे त्वरित कंपनीवर कारवाई होणे अपेक्षित आहे. सदरच्या कंपनी विरुद्ध फौजदारीचा गुन्हा देखील दाखल व्हावा असे नागरिकांचे म्हणणे हाय.