Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेरात ट्रॅक्टर चालकाचा कहर : १२ दुचाकीना उडविले !
    क्राईम

    जामनेरात ट्रॅक्टर चालकाचा कहर : १२ दुचाकीना उडविले !

    editor deskBy editor deskMarch 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    शहरातील वाकी रोडवरील पोस्ट ऑफिससमोर लावलेल्या जवळपास १० दुचाकींना तेथून भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टने जबर धडक दिल्याने सर्व दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातात सुर्दैवाने कुणालाही इजा झाली नसून ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातून वाकी रोडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जवळपास १० दुचाकींना जबर धडक दिल्याने दुकाकींचे नुकसान झाले असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना २८ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोस्ट ऑफीस कार्यालयासमोर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला होता. परंतु, पोलिसांनी वेळेवर येऊन परिस्थिती लक्षात घेत खोळबंलेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, जामनेर शहरातील वाकी रोडवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया व पोस्ट ऑफिस हे दोघे कार्यालय शेजारी शेजारीच आहेत. या दोन्ही कार्यालयांच्या समोर त्यांच्या ग्राहकांना वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आपली वाहन नाईलाजाने रस्त्याच्या कडेला लावावी लागतात. तर मेन रस्ता ही अरूंद असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा वाहतूकीची कोंडी होत असते.

    तर अनेक छोटे-मोठे अपघात घडतच असतात. त्यामुळे येथे वाहन लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करावी, तसेच रस्त्यावरील वर्दळ पाहता मुख्य रस्त्याची रुंदी ही वाढवावी, अशी मागणी यानिमित्त ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.