• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांचा कहर : बंद गोडावूनचे कुलूप तोडून हजारोचे पापड चोरले !

editor desk by editor desk
March 29, 2025
in क्राईम, जळगाव
0
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

बंद असलेल्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीचा पापड मसाला चोरून नेला. ही घटना २४ ते २६ मार्चदरम्यान औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये घडली.  याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी बाहेर डीपी बंद करीत वीजपुरवठा खंडित केला व त्यानंतर चोरी केल्याचे समोर आले आहे.

मिलाल्लेया माहितीनुसार, अतुल विश्वनाथ मुळे (५९, रा. मोहाडी रोड) यांचा मसाल्याचा व्यवसाय असून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे ते स्टॉकीस्ट आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये त्यांचे श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाचे गोदाम आहे. त्यात ते पापड मसाल्यासह इतरही मसाले ठेवतात. २४ ते २६ मार्चदरम्यान या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी गोदामातून आठ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीच्या पापड मसाल्याच्या पुड्या असलेल्या ७१ गोण्या चोरून नेल्या. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यात तीन जण चोरी करताना दिसत आहेत. या गोदामामध्ये १० प्रकारचे मसाले ठेवलेले असतात. त्यात ज्यांची किंमत जास्त आहे, असेच मसाले चोरट्यांनी लांबविले आहे.

ही चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी गोदामाजवळ येऊन वीजपुरवठा खंडित केला व अंधारामध्ये त्यांनी चोरी केली. औद्योगिक वसाहत परिसरात कंपनी, गोदामांमध्ये अधून-मधून चोरीच्या घटना सुरूच आहे. त्यात आता तर चोरट्यांची एवढी हिंमत वाढली आहे की, मालवाहू वाहन लावून माल चोरून नेला आहे.

Previous Post

व्यवसायात नवीन करारांमुळे व्यवसायाची स्थिती सुधारेल.

Next Post

४३ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

४३ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group