Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलेच्या हत्या प्रकरणी संशयित एलसीबीच्या ताब्यात !
    क्राईम

    महिलेच्या हत्या प्रकरणी संशयित एलसीबीच्या ताब्यात !

    editor deskBy editor deskMarch 26, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मद्यपीपतीने कौटुंबिक वादातून सना अजीज शेख (वय २५, रा. बीड, जि. परळी, वैजनाथ) या विवाहितेची हत्या करीत पळ काढला होता. ही घटना वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील वीटभट्टीवर रविवारी मध्यरात्री घडली होती. पसार झालेल्या संशयित अजीज सलीम शेख (वय ३५) याच्या पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

    सविस्तर वृत्त असे कि, किशोर डिगंबर पाटील यांचे वेल्हाळे शिवारातील शेत गट क्रमांक ६५१ मध्ये शेत असून या शेतात अली हुसेन इसाक कुरेशी हे वीटभट्टी चालवतात. या वीटभट्टीवर कामासाठी परळी जिल्ह्यातील काही कुटूंब आले आहेत व तेथेच त्यांचा कुटूंबातील सदस्यांसह रहिवास आहे. अझहर नियोजोद्दीन शेख (वय २४, जुने स्टेशन परळी वैजनाथ, जि. बीड, ह. मु. वेल्हाळा शिवार) ह देखील आपली मोठी बहिण सना व मेहुणा अजीज शेख तसेच आई, वडिल, भाऊ, वहिनी आदींसह वीटभट्टीवर कामाला आहेत. संशयीत अजीज शेख याला दारूचे व्यसन असल्याने तो सना शेख यांचा सातत्याने छळ करून मारहाण करीत होता व हा दररोजचा प्रकार असल्याने यास सर्व कंटाळले होते. शनिवारी अझहर शेख, शर्पू, कृष्णा, ज्वाला, अजीज शेख यांनी वरणगाव येथे बाजारासाठी येत बाजारहाठ केला व यावेळी पुन्हा अजीज शेख याने मद्य प्राशन करून रात्री सव्वाआठ वाजता वीटभट्टी गाठली. मध्यरात्रीच्या सुमारास अजीज शेख याने पत्नी सनासोबत पुन्हा वाद घातला व दारूच्या नशेत तिचा गळा आवळला.

    निपचीत झोपल्या असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दार तोडून खोलीत प्रवेश केला असता सना यांच्या नाकातून रक्त येत असल्याने कुटूंबाने त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत मध्यरात्रीच – खुनानंतर पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला होता. खुनानंतर पसार झालेल्या संशयित अजीज सलीम शेख (वय ३५) याच्या पुण्यात जळगाव गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी बेड्या ठोकल्या. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व कृष्णा देशमुख यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.