Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवार राज ठाकरेंवर संतापले : “तो कधी निवडून आलाय का?
    राजकारण

    अजित पवार राज ठाकरेंवर संतापले : “तो कधी निवडून आलाय का?

    editor deskBy editor deskMarch 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात महायुती सरकारवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “मूळ विषय बाजूला राहिले आणि लोकांना बाकीच्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जात आहे. संपूर्ण विधानसभेतच खोक्याभाई भरले आहेत. एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात? मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत. त्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन,” असेही ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना टोला लगावला. “तुम्ही एका खोक्याभाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोक्याभाईंची आहे,” अशा शब्दांत राज यांनी महायुतीला टोला लगावला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

    राज ठाकरेंनी आमदारांबाबत खोक्याभाई शब्द वापरून केलेल्या टीकेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, असा प्रश्न पत्रकारांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर “तो कधी निवडून आलाय का?” असं म्हणत अजित पवार यांनी मनसेच्या निवडणुकांतील अपयशावर बोट ठेवलं आहे. अजित पवार यांनी राजकीय अपयशावरून डिवचल्यानंतर आता राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पहावे लागणार आहे.

    अख्खं सभागृह खोक्याने भरलं आहे की नाही, त्यांच्या मताशी मी असहमत आहे. पण राज ठाकरे जे बोलत आहेत हे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांनी सध्याच्या राजकारणावर बोट ठेवले आहे. असे खोके भाई असल्यामुळे ते निवडणुकीत सहज जिंकून येतात. सगळे खोके भाई एकत्र झाले आणि राज्यात सरकार बनवलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.