जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींसोबत एका ३५ वर्षीय तरुणाने अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजता घडली याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६ वर्षीय आणि ९ वर्षीय या दोन अल्पवयीन मुली आपल्या परिवारासह जळगाव शहरातील एका परिसरात वास्तव्याला आहे. दरम्यान संशयित आरोपी मनोज भीमराव धनगर (वय- २५ रा. जळगाव ) याने या दोन्ही मुलींसोबत अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार रविवारी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शनीपेठ पोलिस ठाण्याततक्रार दिल्यावरून संशयित आरोपी मनोज भीमराव धनगर याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहे.