जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके येथे घरासमोर उभे प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा लांबवल्याची घटना शुक्रवार २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात एका जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, जळके येथील गोपाळ वाल्मिक सोनवणे वय २९ यांच्याकडे एम.एच.१९ ए.क्यू.७५४४ या क्रमांकाची प्रवासी वाहतुक रिक्षा आहे. लॉकडाऊनपासून धंदा नसल्याने त्यांनी ही रिक्षा घरासमोर उभी केलेली आहे. ते दुसर्याची रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवतात. शुक्रवारी दुपारी गोपाळ सोनवणे यांची पत्नी घरात काम करत असताना त्यांना अंगणात उभी रिक्षा राहुल भरत जाधव रा. वराड ता.जळगाव हा घेऊन जाताना दिसला. तो परत रिक्षा घेऊन येईल या अपेक्षेने वाट बघितली. मात्र तो रिक्षा परत घेऊन आला नाही, जळके गावात जाऊन शोध घेतला असता रिक्षा मिळून आली नाही. अखेर याबाबत गोपाळ सोनवणे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून राहुल भारत जाधव यांच्याविरोधात ४० हजार सुपे किमतीची रिक्षा लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.