जळगाव : प्रतिनिधी
कानसवाडा-शेळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३८, रा. कानसवाडा) यांच्या खूनप्रकरणी भरत भास्कर पाटील या तिसऱ्या संशयितास नशिराबाद पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.
माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा दि. २१ मार्च रोजी सकाळी खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार असलेल्या भरत पाटील याला नशिराबाद पोलिस ठाण्याचे सपोनि ए.सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ शरद भालेराव, शिवदास चौधरी, पोकों सागर बिडे यांनी ताब्यात घेतले.