जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कानसवाडा-शेळगावचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (३८) यांच्या खूनप्रकरणी परेश उर्फ सोन्या भरत पाटील (२६) व देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील (२४) या दोघं भावांना अटक करण्यात आली.
या दोघांचे वडिल भरत भास्कर पाटील हा पसार आहे. अटकेतील दोघांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ग्रामपंचायतच्या कामकाजाच्या जुन्या वादातून माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा २१ मार्च रोजी सकाळी खून केला होता. यातील देवेंद्र पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २१ रोजी अटक केली. दुसरा संशयित परेश पाटील याला नशिराबाद पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.