सातारा : वृत्तसंस्था
राज्याचे ग्राम विकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या सातारा शहरातील महिलेला खंडणी प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे .शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली सातारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली एक कोटी रुपये खंडणी घेत असताना तिला पकडण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील एका महिलेला मानसिक त्रास दिल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार व शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटले होते या प्रकरणी त्याचे वृत्तांत करणारे एका पत्रकाराला सुद्धा अटक झाली होती .सदर महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत माध्यमांना मुलाखती सुद्धा दिल्या होत्या.
मात्र, शुक्रवारी सकाळी सातारा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेला अटक केली आहे सदर महिलेने या प्रकरणी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता हे प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटी रुपये स्वीकारत असतानाच सातारा पोलिसांनी ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे .या महिलेला राहत्या घरातून अटक करण्यात आल्याची माहिती आहे या कारवाई संदर्भात सातारा पोलिसांनी तात्काळ बोलण्यास नकार दिला आहे