जळगाव : प्रतिनिधी
पिंप्राळा हुडको भागात मंगळवारी रात्री १० वाजता किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी घटना झाली. या हाणामारीत लाकडे, दगड, विटा आणि कोयत्याचा वापर करून एकमेकांना जखमी करण्यात आले. या संदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको भागातील दोन गटांमध्ये मंगळवारी रात्री १० वाजता किरकोळ वाद झाला. पहिल्या गटातील पूजा शशिकांत सावळे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राहुल निकम, अनिता निकम, सोनाबाई रणशिंगे, ज्योती निकाळजे, गणेश निकाळजे, निखिल निकाळजे, विशाल निकाळजे, मुकेश निकाळजे आणि हिराबाई निकाळजे या नऊ जणांविरूद्ध तर दुसऱ्या गटातील निखिल गणेश निकाळजे (वय १९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित किशोर लक्ष्मण सपकाळे, रोहित सपकाळे, दीपक सपकाळे, मिलिंद चित्ते आणि विकी सपकाळे यांच्याविरूद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा नोंदविला आहे