मुंबई : वृत्तसंस्था
शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. 35 लक्ष, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने एकमताने राम सुतार यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली.
राम सुतार यांचे वय सध्या शंभर वर्षे आहे. ते अजूनही आपल्या कामात तितक्याच तडफेने व्यस्त आहेत. त्यांनी उभारलेली पुतळे आणि शिल्पाचे जगभरात कौतुक झाले. त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
राम वनजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत. त्यांच्या नावावर जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बवनवण्याचा विक्रम आहे. 100 वर्षांचे असलेल्या सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावी झाला आहे. सुरुवातीला सुतार यांना श्रीराम कृष्ण जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील जे. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेत शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांना मानाचे मेयो सुवर्णपदक मिळाले. 1954 मध्ये भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीची सुरुवात केली. त्यानंतर ते 1959 मध्ये सुतार यांनी दिल्लीत माहिती वर दूरसंचार मंत्रालयात नोकरी सुरू केली. इथे काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि शिल्पकार म्हणून काम करण्यास सुरू केली.
राम सुतार यांनी पंचाहत्तर वर्षाच्या शिल्प घडविण्याच्या कारकिर्दीत व्यक्तिशिल्पे, म्युरल्स, एखाद्या संकल्पनेला धरून शिल्प असे अनेक शिल्पकला प्रकार हाताळले. दिल्लीत त्यांनी व्यक्तींचे सुमारे पन्नास पुतळे बनविले. त्यांनी बनविलेल्या शिल्पाकृती संसदभवन,राष्ट्रपती भवन आणि विविध राज्ये आणि देशविदेशात आहेत. ते कधीही गुणवत्तेशी तडजोड करीत नाहीत. त्यांनी आकाराने मोठे तसेच संख्येने मोठे असे अनेक पुतळे बनविले. विचारमग्न अवस्थेत असलेले महात्मा गांधी यांचे संसदभवन येथील कलात्मक व्यक्तीशिल्प आणि वल्लभभाई पटेल ह्यांचे सरदार सरोवर येथील उत्तुंग शिल्प ही त्यांची सर्वात लोकप्रिय शिल्पे आहेत.