• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : वृद्धाला ५ वर्षाचा कारावास !

editor desk by editor desk
March 20, 2025
in अमळनेर, क्राईम
0
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : वृद्धाला ५ वर्षाचा कारावास !

अमळनेर : प्रतिनिधी

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला अमळनेर विशेष न्यायालयाने ५ वर्षाचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी बुधवारी हा निकाल दिला. लोटन पंडित पाटील (६१), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दंड न भरल्यास त्याला आणखी सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. अत्याचाराची ही घटना ९ जानेवारी २०२४ रोजी तालुक्यातील एका गावात घडली होती. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाइकांनी तक्रार दाखल केली होती. आरोपीस ११ जानेवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. ९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास, पीडित बालिका आपल्या घराच्या बाहेर असताना हा धक्कादायक प्रकार घडला. निष्पाप मुलीकडे पाहून आरोपीने तिला लक्ष्य केले. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काकू तिथे धावून आली आणि हे पाहताच आरोपी घाबरून पळून गेला.

नातेवाइकांनी विलंब न लावता पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी वेगाने कारवाई करत अवघ्या दोनच दिवसांत ११ जानेवारीला आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला आणि सबळ पुरावे गोळा करून आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

या खटल्यात सरकारी वकील अॅड. आर. बी. चौधरी यांनी आवश्यक ती सर्व साक्षी मांडल्या. एकूण ९ साक्षीदार तपासले गेले, ज्यामध्ये पीडित मुलगी, फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षींना न्यायालयाने महत्त्व दिले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १० अंतर्गत आरोपीला ५ वर्षांची सश्रम शिक्षा सुनावली तसेच, ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ६ महिने शिक्षा भोगावी लागेल, असा आदेशही देण्यात आला. तपासकार्यासाठी पोलिस कर्मचारी राहुल रणधीर, फौजदार उदयसिंग साळुंके, पो. हे. कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, प्रमोद पाटील, भरत इशी आणि सतीश भोई यांनी सहकार्य केले.

Previous Post

व्यवसायात अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका.

Next Post

व्यापाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ११ लाख रुपयांची खंडणी वसूल !

Next Post
व्यापाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ११ लाख रुपयांची खंडणी वसूल !

व्यापाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ११ लाख रुपयांची खंडणी वसूल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group