जळगाव : प्रतिनिधी
उसनवार घेतलेले पैसे परत कर अशी मागणी करीत मीराबाई हंसराज राठोड (५०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या महिलेला दोन जणांनी मारहाण करीत डोक्यात सळई मारून गंभीर जखमी केले. ही घटना १६ मार्च रोजी रात्री रामदेववाडी येथे घडली.
सविस्तर वृत्त असे कि, रामदेववाडी येथील रामलाल कोल्हा राठोड हा मीराबाई राठोड यांच्याकडे आला व त्यांच्यामध्ये उसनवारीच्या पैशावरून वाद झाला. यावेळी राठोड याने लोखंडी सळई महिलेच्या डोक्यात मारली. तसेच तर त्याच्या मुलानेदेखील महिलेला मारहाण केली.
या प्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील करीत आहेत.