लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीचे आदेश दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातून निघाले विशेष म्हणजे एकनाथराव खडसे यांनी तात्काळ कार्यमुक्त करा यासाठी मंत्रालयात तळ ठोकून बसल्याने रात्री दहा वाजता नाशिक विभागाचे मुख्य अभियंता विभागाचे अधीक्षक जेऊरकर यांच्या स्वाक्षरीने तातडीने प्रशांत सोनवणे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. सत्ता आणि विरोधी पक्ष हे काय काम करतात हे या प्रकारावरून लक्षात येते. या निमित्ताने पुन्हा जळगाव जिल्ह्यात खडसेंचा वरचष्मा झाला आहे. अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा या निमित्ताने मोठी खळबळ उडाली आहे.