Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २२ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय : माहेरच्यांचा गंभीर आरोप !
    क्राईम

    २२ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय : माहेरच्यांचा गंभीर आरोप !

    editor deskBy editor deskMarch 18, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सतत दारू पिऊन घरी येवून मारहाण करणारा पती आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. दरम्यान, मुलीला गळफास देवून तिला ठार मारण्यात आले आहे, असा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी रात्री घरी कोणी नसताना 22 वर्षीय सोनी चव्हाण हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र ही घटना सोनी चव्हाण यांच्या माहेरी कळल्यानंतर त्यांनी ही आत्महत्या नसून सोनी हिला पती आणि सासरच्या मंडळींनी मारून टाकले असल्याचा आरोप केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे सोनी चव्हाण(वय 22) ही विवाहिता आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. सोनी हिने सोमवारी १७ मार्चला रात्री १० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसताना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.आश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान विवाहितेच्या आई आणि वडिलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेत आक्रोश केला. गेल्या तीन वर्षांपासून तिचे पती चेतन गजानन चव्हाण याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे दारू पिऊन मारहाण करणे सुरूच होते. त्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने यापूर्वीं देखील विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आत्महत्या नसून तिला गळफास देवून ठार मारले आहे, असा आरोप मयत विवाहिता सोनी चव्हाण यांची आई अनिता विनोद जाधव यांनी केला आहे. अनिता जाधव या सोयगाव तालुक्यातील नांद्रा ताड या गावच्या आहेत.

    दरम्यान, आपल्याला मुलीला ठार मारणाच्या आरोप करत तिच्या पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी मृतक महिलेच्या आई-वडिलांनी केली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विवाहितेच्या पश्चात सात्विक (वय-३), प्रथमेश (वय-५) ही दोन मुलं, आई-वडील, एक भाऊ, लहान बहीण असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.