जळगाव : प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची औरंगाबाद नगर परिषद संचानालय येथे बदली झाली असून ही नियमित बदली नसून फार मोठ्या अंतर्गत राजकीय घडामोडी घडल्यानंतर उचल बांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या दणक्याने ही बदली झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात एकनाथराव खडसे व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून भ्रष्ट कारभाराविरोधात विडा उचलला होता. आठ चार्ज सीट फाईल करण्यात आल्या होत्या. दोन दिवसापूर्वीच वाघुर येथे मोठा भव्य दिव्य अजय अतुलचा कार्यक्रम सोनवणे यांनी केला त्यानंतर अवघ्या 24 तासात सोनवणे यांना मोठा धक्का देण्यात एकनाथराव खडसे यशस्वी झाले आहेत.
…. मास्टर माईंड सुभाष पाटील
सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट कारभाराचे एक एक कागद गेल्या दोन वर्षापासून गोळा करण्याचे काम माजी जि प सदस्य सुभाष पाटील हे करीत होते विशेष म्हणजे पदरचे मुंबई नाशिक जळगाव येथे फेऱ्या मारून पंधरा ते वीस लाख रुपये भाड्यामध्ये व कागदांमध्ये खर्च केला आणि शासन दरबारी पाठपुरावा एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून केला. अखेर सुभाष पाटील यांच्या या लढ्याला यश आले आहे. लाईव्ह महाराष्ट्राशी बोलताना सुभाष पाटील म्हणाले की माझा लाख रुपये गेल्या दोन अडीच वर्षात खर्च झाला आहे भ्रष्ट कारभाराविरुद्ध माझी लढाई आहे विशेष म्हणजे मी अधिकाऱ्यांना हटू शकलो परंतु शासनाचे सुमारे जादादराचे टेंडर गेल्या दोन वर्षात झाल्यामुळे हजार ते पाचशे कोटीचे नुकसान झाले आहे हे टेंडर रद्द करण्यासाठी व जातादाराचे झालेले टेंडर ची रक्कम वसूल करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सुभाष पाटील यांनी सांगितले.