Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्याच्या बकऱ्या लांबविल्या
    क्राईम

    चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्याच्या बकऱ्या लांबविल्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वलवाडी येथे शिवारात वनविभागाच्या जागेवर राहत असलेल्या मजुराला चाकूचा धाक दाखवत बकऱ्या चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी की, बापू खंडू पाटील (वय-६५) रा. वलवाडी ता. भडगाव जि. जळगाव हे वलवाडी शिवारात वास्तव्याला आहे. शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बकर्‍या व बकऱ्यांचे पिल्ले असून ते जोडधंदा करतात. दरम्यान गुरुवार २४ मार्च रोजी सकाळी ११.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन जणांनी येऊन त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून २८ हजार रुपये किमतीच्या ४ बकऱ्या व ४ पिल्ले जबरी चोरून नेले आहे. याप्रकरणी बापू पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात तीन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.