जळगाव : प्रतिनिधी
ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. गद्दार-खोके हा डाग जनतेने पुसला असून विरोधकांची बोलती बंद केली आहे. असे रोखठोक मत व्यक्त करत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत जनतेच्या मनातला सूर व्यक्त केला. “मी स्वार्थासाठी नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व जोपासण्यासाठी उठाव केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही.” अशा ठाम शब्दांत त्यांनी इशारा दिला. सत्ता ही टिकवण्यासाठी नाही, तर समाजाच्या सेवेसाठी असते. गरीब जनतेच्या सेवेमुळे मला उर्जा मिळते. म्हणूनच मी दिवस-रात्र जनतेसाठी झटतो. शिरसोलीच्या जनतेचा विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. हा सन्मान स्वीकारताना हा केवळ सत्कार नाही, तर तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची पोच पावती आहे. तुमच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शिरसोलीत बारी पंच मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल – रखुमाई मातेची मूर्ती, नागवेल पानाचा कंडा, शाल – श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.. सोबत शिरसोलीतील विविध समाजिक संस्था व गावातील विविध मंडळ,युवा सेना शिवसेना भाजपा महायुती चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते , महिला युवती सेनेच्या पदाधिकारी यांनीही भाऊंचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासिकासह बारी समाज मंगल कार्यालय लवकरच उभारणार असून DPDCतून ५ कोटींच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन १५ दिवसांत करणार आहे. ३३ KVA वीज उपकेंद्र मंजूर केले असून बारी समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी ‘संत श्री रुपलाल महाराज आर्थिक महामंडळ’ स्थापन केल्याने समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागवेलची पाने, बारी समाजाची शान, शिरसोलीच्या विकासासाठी मी आहे ठाम! असल्याचे सांगताच एकाच जल्लोष ग्रामस्थांनी केलां. यावेळी हायस्कूलचे चेअरमन विलास बारी यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासिका, बारी समाज मंगल कार्यालय आणि महिला बचत गटांसाठी उमेद भवन उभारण्याची मागणी केली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरीचे संकेत दिले.
युवासेना तालुका प्रमुख रामकृष्ण काटोले यांनी विधानसभा निवडणुकीत युवासेनेने ही ठोक कामगिरी बजावली ,विजय हा सह जा सहजी मिळालेला नाही भाऊनी मतदार संघात केलेला विकास ,शिंदे साहेबांनी योजनांचा केलेला पाऊस यामुळे विजय शक्य असल्याचे सांगितले शिरसोली हे हिंदुत्ववादी विचारांनी भारलेले गाव आहे. त्यामुळे इथला विकास आणि संस्कृती जोपासण्याचे काम अखंड सुरू राहील! असे शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर महाजन, हर्षल चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केली.
यांची झाली उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी जि.प. सदस्य सुरेश अस्वार यांनी केले, तर आभार गिरीश वराडे यांनी मानले.
व्यासपीठावर प्रमुख उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, माजी सभापती नंदलाल पाटील , माजी जि.प. सदस्य पप्पू सोनवणे, धनुबाई आंबटकर, भाजपचे तालुका अध्यक्ष हर्शल चौधरी, मनोहर पाटील, सरपंच हिलाल भिल , सोसायटी चेअरमन बाला पाटील, सूर्यवंशी बारी पंच मंडळाचे अध्यक्ष भीमा अस्वार, उप अर्जुन काटोले, रामकृष्ण कटोले,रवींद्र बारी, देवराम नागपुरे, शरद चव्हाण, राजेंद्र आंबटकर, गिरीश वराडे, रामदास ताडे, गोकुळ ताडे, लक्ष्मण नाईक, रघुनाथ फुसे, मोहन बुंधे, मुकेश अस्वार, नंदलाल सुने, शिवदास बारी, विलास बारी, उमाजी पानगळे, प्रणय सोनवणे, मुदस्सर पिंजारी ग्रा सदस्य, विनोद अस्वार, भगवान बोबडे, अर्जुन पाटील, जितु पाटील, श्याम कोगटा, युवा सेनेचे रामकृष्ण काटोले, रमेशआप्पा पाटील, संदीप सुरळकर, महानगरप्रमुख व नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, मनोज चौधरी, अकील मण्यार, विजय पाटील सर, बबन धनगर, राजू पाटील, पोलीस पाटील, बापू मराठे, नारायण सोनवणे यांच्यासह महिला व महायुतीचे पदाधिकारी, गावातील सर्व समाज बांधव, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते