मुंबई : वृत्तसंस्था
राज्य निवडणूक आयोगाच्या 10 मार्च 2025 रोजीच्या आदेशानुसार जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच नवनिर्मित व मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होवू शकलेल्या ग्रामपंचायती आणि निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे 28 फेब्रुवारी 2025 अखेर रिक्त झालेल्या सदस्य, थेट सरपंच पदांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
यासाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी बुधवार, 19 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध होईल. 19 मार्च ते 24 मार्च 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. 26 मार्च 2025 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे कार्यालयामार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या निवडणुकांकरिता पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
- प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक – बुधवार, 19 मार्च 2025
- हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी – बुधवार, 19 मार्च 2025 ते सोमवार, 24 मार्च 2025 पर्यंत
- प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक – बुधवार, 26 मार्च 2025
या निवडणुकांकरिता पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक बुधवार, 19 मार्च 2025. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी बुधवार, 19 मार्च 2025 ते सोमवार, 24 मार्च 2025 पर्यंत आणि प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक बुधवार, 26 मार्च 2025 असा असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळवण्यात आले आहे.