Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : शिंदे व पवारांना कॉंग्रेसची मुख्यमंत्री पदाची ऑफर !
    राजकारण

    मोठी बातमी : शिंदे व पवारांना कॉंग्रेसची मुख्यमंत्री पदाची ऑफर !

    editor deskBy editor deskMarch 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदे अर्थात दादा आणि भाई यांना थेट राज्याचे मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली आहे. काँग्रेससोबत या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला मुख्यमंत्री करू असा विश्वास त्यांनी दिला आहे.

    अर्थातच होळी धुळवडीच्या निमित्ताने बुरा न मानो होली है…! अशीच ही त्यांची राजकीय धुळवड निमित्ताने माध्यमांशी बोलताना ही ऑफर असल्याने सत्तापक्षाने त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. उलट पुढील दहा-पंधरा वर्षे काँग्रेसला राज्यात संधीच नाही असा टोला भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांना लगावला आहे. राज्याचा सर्व कारभार मुख्यमंत्री कार्यालयातूनच चालत असल्याने व मुख्यमंत्री आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांनी हा नवा आयाम दिला असल्यामुळे उपमुख्यमंत्री पदी असलेले एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे तर त्रासले आहेत. या दोघांपैकी कोणीही जवळचा नाही हे त्यांना देखील आता माहीत झाले आहे.

    यामुळेच आता अजित पवार एकनाथ शिंदे यांनी आमच्या सोबत यावे त्यांना आम्ही मुख्यमंत्री पदाची संधी देऊ काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे दोघांनाही निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे आम्ही हे संधी त्यांना देऊ असे माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केले अर्थातच नाना पटोले यांच्या या ऑफरला सकारात्मक प्रतिसाद कोणीही दिला नसला तरी त्याची राजकीयदृष्ट्या चर्चा शुक्रवारी ऐन धुळवडीच्या दिवशी जोरात आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.