बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसपासून राज्यभर ‘खोक्या’चे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली असून त्याला आज बीड येथे आणले जात आहे मात्र त्यापूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर कारवाईचा बुलडोजर फिरवण्यात आला आहे. पैशाची बंडलं फेकणारा आणि पैसे उधळणारा खोक्याने वनविभागाच्या जागेवर काचेचा साज चढवलेलं घर बांधलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून खोक्याचे कारनामे समोर आले आणि खोक्याचं घर ही वनविभागाच्या जागेवर बेकायदेशीरपणे असल्याचं समजलं आणि त्यानंतर वनविभागाने पोलिसांच्या मदतीने खोक्याचं घर जमीनदोस्त केलं आहे. ढाकणे कुटुंबाला केलेली मारहाण, हरिणांच्या शिकारीचा आरोप, वनविभागाच्या छाप्यामध्ये खोक्याच्या घरामध्ये सापडलेले शिकारीचे घबाड आणि वन्य प्राण्यांचा मांस. त्यामुळे खोख्या भोसलेचा शोध बीड पोलिसांकडून सुरू होता. खोक्याला अखेर प्रयागराजला अटक करण्यात आली. आता त्याला बीडला आणलं जात आहे. तर खोक्या बीडमध्ये येण्याआधीच त्याच्या घरावर बुलडोजर चाललाय.
खोक्याच्या घरातून जे सामान बाहेर काढण्यात आलं त्यात भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचाही फोटो होता. या फोटोवर बॉस असं लिहिले आहे. खोक्या भोसले आपलाच कार्यकर्ता असल्याचं धसांनीही मान्य केलं. त्याच वेळेला खोक्यावर कारवाई करा, हे ही धस म्हणाले होते. अन्याय तिथे माझी दहशत असं खोक्या उघडपणे सांगून पोलिस व्यवस्थेलाच चॅलेंज देत होता. खोक्याची दहशत बुलडोजरच्या कारवाईने संपवण्याचं काम बीड पोलिसांनी सुरू केलं. प्रयागराज कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांडद्वारे बीड पोलिसांनी खोक्याचा ताबा घेतला. बीडमध्ये आणल्यानंतर खोख्या भोसलेला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. पैशाची बंडलं कारच्या डॅशबोर्डवर फेकतानाचा पहिला व्हिडिओ भोसलेचा समोर आला. त्यानंतर पैशाचा खोख्याला किती माझ आहे याचे एका पाठोपाठ एक व्हिडिओ व्हायरल झालेत.