Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आज ‎परंपरागत नारळाचा होळी उत्सव !
    राजकारण

    आज ‎परंपरागत नारळाचा होळी उत्सव !

    editor deskBy editor deskMarch 13, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा :  वृत्तसंस्था

    राज्यातील बुलढाणा जिह्यातील पिंपळगाव‎सैलानी येथे गुरुवारी १३ मार्च रोजी हजारो नारळाच्या होळींची प्रथा असलेल्या हाेळीचा उत्सव‎साजरा केला जाणार आहे. या होळीत नारळाला‎बाहुले, गोटे, बिबे, लिंबू, खिळे ठोकून ते मनोरुग्णाच्या‎अंगावरुन आेवाळून होळीत टाकले जातात. अंगावरील‎कपडेही या होळीत टाकण्याची पंरपरा अाजवर चालत‎अाली अाहे. मागील वर्षी एका अज्ञाताने ही होळी‎पेटवली होती.‎

    मागील चार दिवसांपासून या यात्रेसाठी भाविकांची‎वर्दळ वाढली अाहे. या भाविकांच्या उपस्थितीत‎ गुरुवारी दुपारी तीन वाजता मुजावर यांच्या हस्ते पूजा‎विधी करुन होळी पेटवली जाणार आहे. या ठिकाणी‎यात्रेकरुंचे मात्र हाल होत असतात. पिण्याच्या पाण्याची‎व्यवस्था नसते, प्रसाधन गृह नसल्याने उघडयावरच‎घाण करत भाविक निघून जातात. तर १९ मार्च रोजीच्या‎संदलसाठीही भाविक थांबतात. काही भाविक नव्याने‎दाखल होतात. अनेक भाविक झोपड्या करून राहत‎आहेत. यात्रेचा मुख्य दिवस असलेल्या संदल या‎दिवशी लाखो भाविक सैलानीत येणार आहेत. यात्रा‎सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस‎प्रशासन व सैलानी ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात‎आले आहे.‎

    जिल्हाधिकारी या यात्रेचे नियोजन बैठक घेऊन‎आधीच सूचना केलेल्या आहेत. पालकमंत्री यांनीही‎यात्रेत पाण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले आहे.‎मात्र, येथे पिण्याचे पाणी मिळेल याची शक्यता कमी‎असते. शितपेये, अवैध धंदे या यात्रेत मोठया‎प्रमाणात चालतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.‎मनोरुग्णांना बेवारस सोडणाऱ्यांवरही कार्यवाही होणे‎अपेक्षित आहे. येथे मनोरुग्णालये उभे करण्यासाठी‎अजूनही शासनाकडून पावले उचललेली नाहीत.‎

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावसह ७ महानगरपालिकेत भाजपचे महापौर !

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    नशिबाला हरवून यशाला गवसणी; ममता नाकतोडेंची प्रेरणादायी भरारी !

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.