यावल प्रतिनिधी । यावल तहसिल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या करीता घंटानाद आंदोलन केले व काळ्या फिती लावुन कामकाज केले कर्मचाऱ्यांच्या शासना कडे प्रलंबीत मागण्या संर्दभात टप्प्या टप्प्याने ओदालन केले जात आहे. पुढील टप्पात २८ मार्च ला संप तर ४ एप्रिल पासुन बेमुदत संप कर्मचारी करणार आहे.
राज्यातील महसुल विभागातील महसुल सहाय्यकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त असुन एका महमुल सहाय्यकाको २ ते ३ संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तनावात असुन महमुल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करणेस टाळाटाळ होत आहे. तसेच अव्वल कारकुन / मंडळ अधिकारी संवर्गातुन नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन वर्षां पासुन प्रलंबीत आहे अशा विविध मागण्या बाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून केवळ आश्वासन मिळत असुन आश्वासनाची पुर्तता होत नसल्याने महसुल कर्मचारी आंदोलन करत आहे बुधवारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घंटानाद आंदोलन केले व मागण्या संर्दभात घोषणा दिल्या आणी काळ्या फिती लावुन त्यांनी कामकाज केले तर आता पुढील टप्प्यात दिनांक २८ मार्च रोजी एक दिवशीय लक्षणीक संप कर्मचारी करणार आहेत तर मागण्या मान्य न झाल्यास ४ एप्रिल पासुन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे असे कर्मचाऱ्यांनी सांगीतले या आंदोलनात महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे आर. बी. माळी, निवासी नायब तहसिलदार आर.के.पवार, नायब तहसिलदार भारती भुसावरे, राहुल सोनवणे, मुक्तार तडवी, आर. बी. माळी, प्रदिप मुंद्रे, लियाकत तडवी, रविंद्र मिस्तरी, भाग्यश्री इंगळे, पी. पी. कांबळे, सी. डी. वानखेडे, वाय. डी. पाटील आदी कर्मचारी सहभागी झाले होते