चोपडा : प्रतिनिधी
वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अमित दिलीप सुलक्षणे (३५) यांना दि. १२ रोजी साडेचार हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांच्या घरी नवीन वीजमिटर बसवून देण्याकरीता अधिकारी अमित सुलक्षणे यांनी साडेपाच हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत केलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदारांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम ५५०० व तडजोडअंती ४५०० रुपयाची मागणी केल्याचे दिसून आले. ही लाच स्विकारताना बुधवारी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.