• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मराठी आली पाहिजे हे कुठे लिहिलंय? व्हिडीओ व्हायरल !

editor desk by editor desk
March 12, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
मराठी आली पाहिजे हे कुठे लिहिलंय? व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी बोलणे महत्वाचे केले असतांना आता मुंबईतील एअरटेलच्या एका कार्यालयातील हिंदी भाषिक महिला कर्मचाऱ्याने मराठीच्या मुद्यावरून मराठी तरुणाशी हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सदर कर्मचारी मराठी का आली पाहिजे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असे कुठे लिहिले आहे का? असे विविध प्रश्न विचारत मला मराठी येत नाही व मी बोलणारही नाही अशी उद्दाम भाषा वापरताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी एअरटेलला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

गत काही महिन्यांपासून परप्रांतीयाच्या मुजोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एअरटेलच्या कार्यालयातील ही घटना समोर आली आहे. सदर व्हिडिओत मराठी तरुण एअरटेलच्या गॅलरीत उभा असल्याचे दिसत आहे. तो आपल्या व्हिडिओ म्हणतो, मी मागील अर्ध्या तासापासून येथे थांबलो आहे. पण माझी तक्रार सोडवली जात नाही. येथील कर्मचारी मराठीत संवाद साधण्यासही नकार देत आहेत. माझ्याशी ते उद्धटपणे बोलत आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, महिला कर्मचारी सदर तरुणाशी हिंदीतून मोठ्या आवाजात बोलत आहे.

यावेळी मराठी तरुण तिला हळू आवाजात नीट बोलून आपली समस्या सोडवण्याचा आग्रह धरतो. पण ती उडवाउडवीची उत्तरे देते. ती आपल्या वरिष्ठांना सांगते की, ही व्यक्ती मला महाराष्ट्रात आहात तर मराठीत बोलले पाहिजे असे सांगत आहे. महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी आली पाहिजे, असे कुठे लिहिले आहे. मला मराठी समजत नाही. त्यामुळे मी हिंदीतच बोलेन. आपण हिंदुस्तानात राहतो. त्यामुळे कुणी कोणतीही भाषा बोलू शकतो. या प्रकरणी मराठी महत्त्वाची आहे असे मला वाटत नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

दुसरीकडे, शिवसेनेच्या ठाकरे गटाने या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात एअरटेलचे ग्राहक कायम ठेवायचे असतील तर या प्रकरणी योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे. अन्यथा मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही. येथे मराठी भाषिक कर्मचारी असलेच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी एअरटेल प्रशासनाचीही भेट घेतली आहे. आमचा इतर भाषांना विरोध नाही. पण येथे किमान 80 टक्के कर्मचारी हे मराठी भाषिकच असावेत.

 

Previous Post

प्रशासनाची सतर्कता: जळगाव शहरातून 14 जण हद्दपार !

Next Post

पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा !

Next Post
पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा !

पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group