जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आकाशवाणी चौकात दि. ६ मार्च रोजी, ट्रकखाली येऊन जखमी झालेल्या रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, रा. भुसावळ) यांचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून पुणे येथे उपचार सुरू होते. दि. ६ मार्च रोजी, सायंकाळी ५ : ३० वाजता भुसावळकडून जळगावातील खोटे नगर परिसरातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पतीसोबत जात असताना पाटील यांच्या दुचाकीला आकाशवाणी चौकात ट्रकने धडक दिली. रागिणी पाटील खाली पडल्या, त्यांच्या हाता-पायावरून ट्रक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात सुरू होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती चंपालाल पाटील, मुलगा देवेंद्र पाटील व मुलगी असा परिवार आहे.