जळगाव : प्रतिनिधी
शाहूनगर भागातील शाहू कॉम्प्लेक्समधील एका पानटपरीवर आलेल्या एका ग्राहकाने फाटकी नोट दिल्याच्या संशयावरून ग्राहकाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजता घडली. याप्रकरणी ग्राहकाच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र गजानन पाटील (वय २२, रा. गरताड, ता. चोपडा, ह. मु. जळगाव) हा युवक रविवारी दुपारी शाहू कॉम्प्लेक्समधील एका पानटपरीवर गेला. त्याठिकाणी एक वस्तू घेतली. मात्र, संबधित ग्राहकाने फाटकी नोट दिल्याच्या संशयावरून अरमान ऊर्फ शहदाब हारुण भिस्ती व हारुण फारुक भिस्ती या दोघांनी संबंधिताला शिवीगाळ केली