छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. कन्नडच्या पिशोरजवळ ऊसाच्या ट्रक उलटून 17 मजूर दबले गेले, त्यातील 13 मजुरांना वाचवण्यात यश आले. मात्र दुर्देवाने 4 मजूरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या अपघातानंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या कन्नडमधील पिशोर खांडीत ऊसाच्या ट्रकला अपघात झाला. ट्रकमध्ये असलेल्या ऊसावर बसून १७ कामगार प्रवास करत होते. अचानक पिशोर खांडीत ट्रक उलटला आणि ऊसाखाली १७ कामगार दबले गेले. या भीषण अपघातामध्ये ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र ही घटना नेमकी कशी आणि कुणाच्या चुकीमुळे झाली याचा तपास पोलीस करत आहे