Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाहन शोरूममधील चोरीप्रकरणात परप्रांतीय चोरट्यांना अटक !
    क्राईम

    वाहन शोरूममधील चोरीप्रकरणात परप्रांतीय चोरट्यांना अटक !

    editor deskBy editor deskMarch 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    महामार्गावर असलेल्या चौधरी टोयाटो व सातपुडा ऑटोमोबाइल या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये झालेल्या चोरीप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी मध्य प्रदेशातील तीन जणांना अटक केली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते भुसावळ दरम्यान तरसोद फाट्यासमोर असलेल्या चौधरी टोयाटो सातपुडा ऑटोमोबाइल या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये गेल्या महिन्यात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली होती. यात चोरट्यांच्या हाती जास्त मुद्देमाल लागला नव्हता, मात्र शोरूममध्ये तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    तपासादरम्यान ही चोरी मध्य प्रदेशातील चोरट्यांनी केल्याची माहिती सपोनि ए. सी. मनोरे यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार मेवालाल पिसीलाल मोहिते (३३, रा. बोरगाव, मध्य प्रदेश), कमलेश उर्फ कालू मन्नलाल पवार (४०, रा. रोसिया, जि. खंडवा, मध्य प्रदेश), अजय धुलजी चव्हाण (२२, रा. घटिया गराठे, मनसौर, मध्य प्रदेश) या तीन जणांना पोहेकों योगेश वराडे, युनूस शेख, गिरीश शिंदे, पोकॉ आरिफ तडवी या पथकाने खंडवा येथून अटक केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.